महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : गोट्या सावंत यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ला प्रकरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार (Gotya Sawant to surrender in district court)नितेश राणे यांचे निकटवर्तीय गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. (Santosh Parab Attack Case) यामुळे नितेश राणे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

गोट्या सावंत यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
गोट्या सावंत यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

By

Published : Feb 7, 2022, 1:14 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ला प्रकरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. (Gotya Sawant to surrender in district court) यामुळे नितेश राणे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

गोट्या सावंत यांना फोन लावा

जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. (Santosh Parab Attack Case) हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांपैकी एकाने आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना फोन लावा असे आपल्यासोबतच्या व्यक्तीला सांगितल्याचे परब यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस गोट्या सावंत यांचा शोध घेत होते. दरम्यान, सामंत यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांचा अर्ज तेथेही फेटाळण्यात आला.

सावंत कणकवलीत येणार शरण

आमदार नितेश राणे यांचे निकटवर्ती असलेले गोट्या सावंत हे कणकवली न्यायालयात मंगळवारी शरण येण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर नितेश राणे हे जिल्हा न्यायालयात शरण आले असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, तब्यतीच्या कारणास्तव ते जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळल्याने त्यांना कणकवली न्यायालयात शरण यावे लागले. हा अनुभव लक्षात घेता सावंत हेदेखील कणकवली न्यायालयात शरण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details