सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला अनुसरून जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना संचारबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर देखील येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. संचारबंदी ची कडक अंमलबजावणी केली असल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये फारशी गर्दी दिसेनाशी झाली आहे.
सिंधुदुर्गमध्ये संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीला सुरूवात; जिल्ह्याच्या सीमांवर आरोग्य पथके तैनात - संचार बंदीची कडक अंमलबजावणी सुरू
जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर आरोग्य पथकांकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहेत. एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे. बाजारपेठांमध्ये भाजीवाले, फळ विक्रेते, किराणा दुकान, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहकांचा अभावा दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरोग्य पथके तैनात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर आरोग्य पथकांकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहेत. एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे. बाजारपेठांमध्ये भाजीवाले, फळ विक्रेते, किराणा दुकान, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहकांचा अभावा दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा-अनेक संकटानंतरही उभे राहिलेले गाव!