सिंधुदुर्ग - शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे ( Stone pelting at MLA Deepak Kesarkar residence ) गटाशी संधान साधणार्या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी ( Deepak Kesarkar residence Sawantwadi news ) येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकाकडून दगड फेक ( Stone pelting Deepak Kesarkar residence ) करण्यात आली. याच ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय देखील आहे.
आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक
शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे ( Stone pelting at MLA Deepak Kesarkar residence ) गटाशी संधान साधणार्या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी ( Deepak Kesarkar residence Sawantwadi news ) येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकाकडून दगड फेक ( Stone pelting Deepak Kesarkar residence ) करण्यात आली. याच ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय देखील आहे.
यावेळी आवाज कुणाचा…? शिवसेनेचा..! अशा घोषणा त्या कार्यकत्याकडून देण्यात आल्या. अचानक झालेली दगड फेक लक्षात घेता त्या ठिकाणी असलेल्या दंगल नियंत्रण पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही घटना काल सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. दरम्यान संबधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून तो नेमका कुठचा? त्याला या ठिकाणी कोणी पाठविले? याची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित पोलीस अधिकार्यांनी सांगितली.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर देखील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्ते नाराज झाले आहेत. वेंगुर्ले येथील शिवसेना कार्यालयातील बॅनरवरील आमदार दिपक केसरकर यांचा फोटो देखील फाडून काढण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, दीपक केसरकर यांचे या कार्यालयाच्यावर निवासस्थान आहे.
हेही वाचा -कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत