सिंधुदुर्ग - कोरोनाच्या नियमात शिथिलता आली आणि पर्यटन व्यवसायानेही नव्याने जोरदार सुरवात केली. मात्र जिल्ह्यातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या जलक्रीडा व्यवसायाला एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने लाल झेंडा दाखवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानायला मेरीटाईम बोर्ड तयार नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत जलक्रीडा व्यवसाय थांबवणार नसल्याची भूमिका जलक्रीडा व्यावसायिकांनी घेतली आहे. यातून नवा संघर्ष जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात उभा राहिला आहे.
ईटीव्ही भारत विशेष : सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर जलक्रीडा व्यावसायिकांचा 'नवा संघर्ष' - कोकण पर्यटन
जिल्ह्यातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या जलक्रीडा व्यवसायाला एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने लाल झेंडा दाखवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानायला मेरीटाईम बोर्ड तयार नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत जलक्रीडा व्यवसाय थांबवणार नसल्याची भूमिका जलक्रीडा व्यावसायिकांनी घेतली आहे. यातून नवा संघर्ष जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात उभा राहिला आहे.
सुमारे ७५ कोटींची गुंतवणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला या तालुक्यांना अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. यापैकी मालवण हा समुद्री पर्यटनाचे माहेरघर म्हणून ओळख असलेला तालुका आहे. मालवणमधील देवबाग, तारकर्ली आणि मालवण किल्ला या ठिकाणांना पर्यटक मोठी पसंती देतात. मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याला वर्षाकाठी चार लाखांच्या आसपास पर्यटक भेट देतात. त्यापैकी सुमारे पावणेदोन लाख पर्यटक जलक्रिडेतील विविध प्रकारांचा अनुभव घेतात. तिन्ही तालुक्यात जलक्रीडा व्यवसायात २२ गट कार्यरत आहेत. तर स्कुबा व्यवसायात २९ गट कार्यरत आहेत. या गटातील तरुणांनी विविध बँकांचे कर्ज काढून साधारण ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र, आज हे व्यावसायिक अडचणीत आहेत.
रश्मीन रोगे सांगतो, आमचा पारंपरिक पद्धतीने मासेमारीचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी आता आधुनिक मासेमारीचा जो उद्रेक झाला, त्यापुढे शासनाने आम्हाला न्याय दिलेला नाही. यामुळे आम्ही जलक्रीडा पर्यटन व्यवसायाकडे वळलो. हे सर्व सुरळीत सुरू होतं. शासनाचा करही आम्ही नियमित भरत आहोत. मात्र आता शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी पाठीशी राहत नाहीत आणि अधिकारी व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे. असे त्याने सांगितले.
दरम्यान कोरोनामुळे आधीच होरपळलेयेथील पर्यटन व्यावसायिकाची शासनाने दखल घेतली नाही तर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आता मच्छिमार बांधवांच्या असंतोषाबरोबर जलक्रीडा पर्यटन व्यावसायिकांचा उद्रेक उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.