महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपातून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत

काल सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.

By

Published : Feb 10, 2021, 4:07 PM IST

शिवसेना नगरसेवक
शिवसेना नगरसेवक

सिंधुदुर्ग -भाजपला धक्का देत शिवसेनेत दाखल झालेल्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सहाही नगरसेवकांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. वैभववाडी शहरात शिवसेना कार्यालय ते वाभवे मधील अदिष्टि देवी मंदिरापर्यंत शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली.

भाजपातून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत

कार्यकर्त्यांनी केले शक्तिप्रदर्शन-

काल या सर्व नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज हे नगरसेवक जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे वैभववाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, तालुका प्रमुख मंगेश लोके, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, कणकवली नगरपंचायत गटनेते सुशांत नाईक, जिल्हा विधानसभा समन्वयक राजू राठोड, अ‌ॅड हर्षद गावडे यांच्यासह शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपला मोठा धक्का-

नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या नगरपंचायतमध्ये भाजपाचे कमळ फुलविण्यात पक्षाला यश आले होते. या सर्व नगरसेवकांनी हातात शिवबंधन बांधल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

नगरपंचायतीवर भाजपची होती एकहाती सत्ता-

वाभवे-वैभववाडीचे पहिले नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, दीपा गजोबार या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, हे तीन नगरसेवक तसेच भाजप वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे, दीपक गजोबार अशा एकूण ९ जणांनी एकत्रितपणे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकांमध्ये पक्षांतर्गत धुसपूस सुरु होती. त्याचा स्फोट होऊन नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details