सिंधुदुर्ग- येथीलबहुचर्चित चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे आज उद्घाटन होत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या विमानतळामुळे पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग देशातील प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ टर्मिनल इमारत आणि इतर प्रकल्पाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन! - CM fadanvis
बहुचर्चित चिपी विमानतळाळाच्या टर्मिनल इमारतीचे आज उद्घाटन होत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या विमानतळामुळे पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग देशातील प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे.
साडेतीन किमीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या भविष्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. १२ सप्टेंबर २०१८ ला पालकमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणेवादात, केसरकर यांनी या विमानतळावर खासगी विमान उतरवून विमानतळाची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी नारायण राणेंनी केसरकर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
त्यामुळे या विमानतळावरून प्रत्यक्षात अद्याप विमान सेवा सुरू झाली नसली,तरी राजकीय आरोप प्रत्यरोपांची अनेक उड्डाणे झाली आहेत. आजच्या या कार्यक्रमाला शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री दीपक केसरकरउपस्थित राहणार आहेत.स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेदेखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री चिपी विमानतळ टर्मिनस इमारती सोबतच इतर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. यात देवगड येथील महत्त्वाच्या आनंदवन बंदर प्रकल्पाचा समावेश आहे.