सिंधुदुर्ग - पावसाळा सुरू झाल्याने कोरोनाबरोबरच जिल्ह्याला लेप्टोस्पायरोसीस या साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने संभाव्य साथीच्या जोखीमग्रस्त 222 गावांची नावे जाहीर केली आहेत.
जिल्हा परिषदेने साथीचा रोग होवू नये, यासाठी दक्षता घेण्याकरता 222 गावांना विशेष सूचना दिल्या आहेत.
काय आहे लेप्टोस्पायरोसीस आजार?
लेप्टोस्पायरोसीस हा लेप्टोस्पायरा या जंतुमुळे होणारा आजार आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागात हा आजार विशेषत: आढळतो. रोगबाधीत प्राणी (मुख्यतः उंदीर,डुक्कर,कुञी) यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दुषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्यास लेप्टोस्पायरोसीस हा रोग होतो.
या गावांना लेप्टोस्पायरोसीसच्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणार अधिक काळजी
- वैभववाडी तालुक्यातील मांगवली, तिरवडे व कोकीसरे या गावांचा समावेश आहे.
- देवगड तालुक्यातील गोवळ, गढीताम्हाणे (रहाटेश्वर), मुटाट, नाडण, कोटकामते, कुणकेश्वर, देवगड (आनंदवाडी), जामसंडे व चाफेड या गावांचा समावेश आहे.
- कणकवली तालुक्यातील, शिवडाव, बोर्डवे, शिरवल, ओसरगांव, हळवल, वागदे, नाटळ, नरडवे, कोळोशी, नांदगांव, तरंदळे, साकेडी, कलमठ, वरवडे, जानवली, जांभूळगांव, साटमवाडीगाव व कासार्डे.
- मालवण तालुक्यातील चिंदर, आचरा, त्रिंबक, पांडलोस, डांगमोडे, मर्डे, कोथेवाडा, मालवण-धुरीवाडा, चाफेखोल, नांदरुख, मालवण शहर, किर्लोस, हिवाळे, ओवळीये, शिरवंडे, विरण, हेदूळ, चुनवरे, खोटले, सुकळवाड, कुसरवे, तळगांव, गोळवण, खांद, पेंडूर व तिरवडे.
- कुडाळ तालुक्यातील मोरेगाव, साळगांव, माणगांव, कालेली, हुमरस, आकेरी, ढोलकरगांव, चाफेखोल, केरवडे. क.नारुर, कुपवडे, आंबेरी, निवजे, कांदुळी, झाराप, आंबडपाल, किनळोस, बिबवणे, मिटक्याचीवाडी, नारुर, मांडकुली, घावनाळे, नेरुर, मुणगी, कुडगांव, चेंदवण, केळूस, वालावल, गावधड, अणाव, ओरोस, आंब्रड, कसाल, पोखरण, पडवे, हुमरमळा, रानबांबुळी, गावराई, कुंदे, कुडाळ, वेताळबांबर्डे, पावशी, बोरभाटवाडी, डिगस, सरंबळ, पिंगुळी, टेंबगाव, ओरोस खुर्द, जांभवडे, भूतवडे, वर्दे, पांग्रड व सोनवडे.
- वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, रेडी, परुळे, कालवी, निवती, होडावडा, तुळस, पाल, आरवली, उभादांडा, सुखटणगांव, वेंगुर्ला शहर, आवेरा, वजराट, भंडारगांव, खानोली, राजापूरकरवाडी, मठ, वेतोरे, दाभोली.
- सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, निगुडे, मडुरे, शेर्ले, बांदा, रोणापाल, नेतर्डे, सातोसे, गाळेल, कास, भिकेकोनाळ, पांडलोस, डिंगणे, आरोसबाग, आंबोली, चौकूळ, माडखोल, भोम, आरोस, तिरोडा, किनळे, आजगाव, आरोंदा, मळेवाड, सोनुर्ली, धाकोरा, कवठणी, वेर्ले, कुणकेरी, कोलगांव, सांगेली, कारिवडे, कलंबिस्त, शिरशिंगे, सावरवाड, मळगांव, ओटवणे, नेमळे, चराठे व निरवडे, तळवडे (कुंभारगाव)
- दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे, पुनर्वसन, तिलारी, मिनीकॉलनी, हेवाळे, मेनकॉलनी, साटेली, पिकुळे, झरेबांबर, घोडगेवाडी, खोक्रल, आयनोडे, पुनर्वसन, बोडदे, परमे, मोर्ले, मांगेली, कोनाळकट्टा, पाल पुनर्वसन, उसप, पाळये, बांबर्डे, भेडशी, सासोली, कसई, पाटये पुनर्वसन, पडवे, माजगांव, गिरोडे, गावठण, आंबेरी, मणेरी, आडाळी, कळणे, उगाडे, डेगवे (मोयझर), पडवे, मोरगांव, तिराळी, निराळी, असनिये, तळकट, कुंब्रल, कुडासे, झोळंबे, भेकुर्ली, कोलझर, शिरवल, तांबुळी, भालावल, कोनशी, घारपी, पणतुर्ली, फुकेरी या गावांचा समावेश आहे.
तळकोकणातून मान्सूनने १२ जूनला महाराष्ट्रात प्रवेश केला. सिंधुदुर्गात शुक्रवारी 77.875 सरासरी पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून पसरणाऱ्या लेप्टोस्पायरोसीस होवू नये,यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.