सिंधुदुर्ग - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नारायण राणे गटाच्या समिधा समीर नाईक तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाली. नाईक यांनी काँग्रेसच्या उमेदवार स्वरूपा विखाळे यांचा पराभव केला. तर म्हापसेकर यांनी संजय आंग्रे यांचा 31 विरुद्ध 19 मतांनी पराभव केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचा निकाल जाहीर. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची अडीच वर्षाची मुदत सपली. यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी या पदासांठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया झाली. पुढील अडीच वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महीला असे आरक्षित होते. यामुळे खासदार नारायण राणे यांच्या समर्थक आणि या प्रवर्गातील समिधा नाईक यांचे नाव घोषित करण्यात आले.
हेही वाचा -'गरिबांविषयी कनव कालही होती अन् आजही आहे.. मंत्रीपदामुळे त्यांच्यासाठीच अधिक काम करेन'
नाईक या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जि. प. मतदार संघातून येतात. तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे जि. प. सदस्य राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर यांचे नाव घोषित करण्यात आले. म्हापसेकर हे दोडामार्ग तालूक्यातील माटणे या मतदार संघातून येतात. मात्र, काँग्रेसकडून शिवसेनेच्या पाठिंब्यावर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
हेही वाचा -शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची गुलाम झाली आहे का? रामदास आठवले यांचा सवाल
हात ऊंचावून घेण्यात आलेल्या मतदानात राणे समर्थक समिधा नाईक यांना राणे गटाचे 24 आणि भाजपची 7 मते मिळून एकूण 31 मते मिळाली. तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवार स्वरूपा विखाळे यांना काँग्रेसची 3 आणि शिवसेनेची 16 मते अशी एकूण 19 मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्येही भाजपच्या राजेंद्र म्हापसेकर यांनी काँग्रेसचे संजय आंग्रे यांचा 31 विरुद्ध 19 मतांनी पराभव करत आपला विजय निश्चित केला.