महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील सावडाव आणि व्हाहनकोंड धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित; पर्यटकांसाठी पर्वणी!

गेल्या तीन दिवसांपासून तळकोकणात दमदार पाऊस बरसत असल्याने सिंधुदुर्गातील प्रसिद्ध सावडाव आणि व्हाहनकोंड धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले आहेत. त्यामूळे पावसाळ्यात विकेंडला जाणाऱया पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

By

Published : Jun 28, 2019, 8:50 PM IST

सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा

सिंधुदुर्ग - पावसाळा सुरू झाला की कोकणातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्याची ओढ सगळ्यांनाच लागलेली असते. त्यात फेसाळणारे मनमोहक धबधबे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. तळकोकणात सध्या दमदार पाऊस सुरू असल्याने सिंधुदुर्गातील प्रसिद्ध सावडाव आणि व्हाहनकोंड धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी ही पर्वणी ठरणार आहे.

सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा


पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतात ते कोकणातील मनमोहक आणि फेसाळणारे धबधबे. अशातच गेल्या तीन दिवसांपासून तळकोकणात दमदार पाऊस बरसत असल्याने येथील धबधबे पुनर्जीवित होऊ लागले आहेत. वर्षा पर्यटनासाठी कोकणात अनेक धबधबे आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेला कणकवली येथील सावडाव धबधबा सलगच्या पावसामुळे प्रवाहित झाला आहे.


मान्सूनच्या आगमनाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा वर्षा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतो. गेले तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सावडाव आणि व्हाहनकोंड हे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. विशेष म्हणजे यातील सावडाव धबधबा सुरक्षित समजला जातो. याठिकाणी दगड कोसळण्याचे प्रकार होत नाहीत. तसेच धबधब्याखाली डोह खोल नसल्यामुळे अबालवृद्ध देखील या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details