सिंधुदुर्ग - धान्य वाटपाबाबत शासनाकडून 27 एप्रिलच्या परिपत्रकानुसार दुकानदारांनी लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचे आदेश आहेत. पण, धान्य नेण्यास ग्राहकांची झुंबड उडत आहे. म्हणूनच शासनाने दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ग्लब्स आदी साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवदेन देण्यात आले.
रेशनसाठी नागरिकांची झुंबड, दुकानदारांकडून पीपीई किट्सची मागणी - सिंधुदुर्ग लेटेस्ट न्युज
शासनाने दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ग्लब्स आदी साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवदेन देण्यात आले.
हे वाचलं का? -मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची लागण
केंद्र शासनाने घोषित केलेले मोफत तांदळाचे वाटप 4 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे देय राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्व दुकानदारांनी तांदूळ वाटप केले. आता शासनाने घोषित केलेले कमिशन हे दुकानदारांना शालेय पोषण आहाराप्रमाणे रोख स्वरुपात मिळावे. धान्यवाटप करताना लक्षात आले की, लाभार्थ्यांच्या कार्डवरील व्यक्ती संख्या व ऑनलाईन व्यक्ती संख्या यात फरक दिसतो. परिणामी दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. म्हणूनच लाभार्थ्यांच्या कार्डवरील ऑनलाईन व्यक्ती संख्या ही ई-सेवा केंद्रामार्फत कमी-जास्त करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष बाबू नारकर, सल्लागार राजीव पाटकर उपस्थित होते.