सिंधुदुर्ग - शिवसेनेत प्रवेश केलेले राणेसमर्थक २००५ सालात बेपत्ता झालेल्या रमेश गोवेकरांचे नेमके काय झाले, याचा तरी ठावठिकाणा सांगतील का, असा खोचक सवाल मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. दरम्यान बेपत्ता गोवेकर यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, यासाठी आपण सीबीआयच्या संचालकांना भेटलो. अनेक प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या राणे समर्थकांनी याचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
२००५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राणेंसोबत असलेले परंतु, आज शिवसेनेत असलेले जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, छोटू पारकर, संग्राम प्रभुगावकर बाबा आंगणे, बाबा सावंत, बंडू चव्हाण, अरुण लाड आणि नुकताच प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कुडाळकर आता तरी बेपत्ता रमेश गोवेकरांचे काय झाले, हे जनतेला सांगतील का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.