सिंधुदुर्ग -नारायण राणे हे सध्या वैफल्यग्रस्थ मनस्थितीत आहेत. जिल्ह्यात चाकरमान्यांमुळे कोरोना पसरला, असे म्हणणारे राणे आता चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला नाही, तर मी रस्त्यावर उतरेल, असे म्हणताना दिसत आहेत. राणे हे दुतोंडी असून त्यांनी चाकरमान्यांबाबत आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.
नारायण राणे दुतोंडी; खासदार विनायक राऊत यांची टीका - विनायक राऊत नारायण राणे टीका
मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली होती. मात्र, गणेशोत्सवाचा मुद्दा पुढे येताच राणेंनी पलटी मारली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात येऊ दिले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा राणे आता देत आहेत.
मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली होती. मात्र, गणेशोत्सवाचा मुद्दा पुढे येताच राणेंनी पलटी मारली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात येऊ दिले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा राणे आता देत आहेत. सध्या ते वैफल्यग्रस्थ मनस्थितीत आहेत कारण भाजपने त्यांना शंभर टक्के वाळीत टाकलेले आहे. कदाचित यामुळेच ते दुहेरी भूमिकेतून बोलत आहेत. चाकरमान्यांसंदर्भात त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे राऊत म्हणाले.
शहरांमध्ये असणाऱ्या चाकरमान्यांची कोकणाच्या मातीशी नाळ जोडलेली आहे. ती सहजासहजी तोडता येणार नाही. त्यामुळे ते गणेशोत्सवासाठी कोकणात येणारच फक्त यावर काही उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. शक्य त्या उपाययोजना महाराष्ट्र सरकार नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.