महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री उदय सामंतांकडून कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेची पाहणी

कणकवली येथील श्रीधर नाईक बालोद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी मंत्री महोदयांनी पुतळ्यासाठी आवश्यक तितका निधी देण्याचे आश्वासन दिले.

sindhudurg guardian minister
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीच्या नियोजीत जागेची पाहणी

By

Published : May 2, 2020, 5:27 PM IST

सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण दरम्याण कणकवलीतील कै. श्रीधर नाईक बालोद्यान आणि शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाली होती. या ठिकाणी पुतळा नव्याने उभारण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीला दिले आहेत. तसेच पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी आज अधिकाऱ्यांसोबत या दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हायवे अथॉरिटीला या कामी निधी कमी पडल्यास कणकवली शहराचे वैभव जपण्यासाठी या कामांना प्रत्येकी ५० लाख रुपये निधी दिला जाणार असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा...Breaking : मुंबईत भाजी विक्रेत्याने पकडली पोलिसाची कॉलर.. पोलिसांनीही दाखवला खाक्या

कणकवलीतील ही दोन्ही ठिकाणे शहराचे सौंदर्य आणि शहराची ओळख या दृष्टीने महत्वाची आहेत. स्थानिक नागरिकांनी देखील अशी भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची दखल घेतली. या दोन्ही ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश परकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परुळेकर आदी उपस्थित होते. मध्यंतरी कणकवलीत शिवाजी पुतळ्यावरून राजकारण पेटले होते. आता पालकमंत्र्यांनीच यात लक्ष घातल्याने हा विषय कसा मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details