महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॅट्रीक चुकवायची असल्यास नारायण राणेंनी निवडणूक लढवू नये; केसरकर यांचा सल्ला - नारायण राणे

विधानसभा निवडणुका काही महिन्यावरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना निवडणुकीसंदर्भात विशेष सल्ला दिला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर

By

Published : Jul 22, 2019, 10:30 PM IST

सिंधुदुर्ग - नारायण राणे पुन्हा निवडणूक लढवणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच नितेश यांनी नारायण राणे कुडाळ-मालवणमधून विधानसभा लढवणार असल्याचे सूतोवाच केले होते. यावरून हॅट्रीक चुकवायची असेल, तर राणे यांनी उभे राहू नये, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर

गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पराभूत झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे वैभव नाईक जाईन्ट किलर ठरले होते. त्यानंतर राणेंनी वांद्र्याची पोटनिवडणूक लढवली. मात्र, तेथेही अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंना पराभवाची धूळ चारली.

दरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र निलेश राणे हे देखील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निलेश राणेंचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी दारुण पराभव केला. यावेळी मात्र त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रथमच निवडणूक लढवली आहे. लोकसभा निवडणुकीतील पुत्राच्या पराभवानंतर राणेंनी निवडणुका लढाव्या की नाहीत? असा प्रश्न पडल्याचे बोलून दाखवले होते. अर्थात यावेळी राणेंचा रोख ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेवर होता.

सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे दोनदा पराभव पाहिलेले राणे पुन्हा निवडणूक लढवणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. यामध्येच त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात एका कार्यक्रमात बोलताना राणे कुडाळ- मालवण मधून निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच केले होते. यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांना छेडले असता हायट्रिक चुकवायची असेल, तर त्यांनी उभे राहू नये असा सल्ला दिला.

सिंधुदुर्गमध्ये एकदा हरला तो हरला, असा इतिहास आहे. त्यानंतर तो कितीही मोठा नेता असला तरी पुन्हा निवडून येत नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी तशी रिस्क घेऊ नये, असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला. तसेच वैभव नाईक पुन्हा निवडून येतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details