सिंधुदुर्ग -जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरुच असून संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला आहे. कुडाळ तालूक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे येथील आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर पुढील २७ गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे.
सिंधुदुर्ग : माणगाव खोऱ्यातील निर्मला नदी धोक्याच्या पातळीबाहेर, २७ गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरुच असून संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला आहे. कुडाळ तालूक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे येथील आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर पुढील २७ गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे.
rain in sindhudurg
कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला -
माणगाव खोऱ्यात गेले तीन-चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदी दूथडी भरून वाहत आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी शेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर २७ गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून नदीलगत असलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीच्या प्रवाहातून वाहून आलेली झाडे पुलाला अडकलेली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर सध्यस्थितीत नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कामानिमित्त आलेले लोक माणगावातच अडकले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बांदा शहरात घुसले पाणी -
सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आज सायंकाळी उशिरा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातील आळवाडी-मच्छीमार्केट बाजारपेठेत घुसले. शहरातील आळवाडी निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. शहरातील निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. पाण्याचा वेग वाढत असल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याची पातळी वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात.
Last Updated : Jul 14, 2021, 8:11 PM IST