महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर जिल्हा न्यायालयात होणार मंगळवारी निर्णय - Pre-arrest Bail Application

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला ( Santosh Parab Attack Case ) केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे हे जिल्हा न्यायालयात ( Sindhudurg Court ) आज हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून यावर उद्या ( दि. 31 जानेवारी ) निकाल देण्यात येणार आहे.

राणे
राणे

By

Published : Jan 31, 2022, 8:10 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्हा न्यायालयात ( Sindhudurg Court ) आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी आज ( दि. 31 जानेवारी ) पार पडली. सकाळच्या सत्रात नितेश राणे यांचे वकील संदीप मानशिंदे आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी आरोपीला आम्ही न्यायालयाच्या ताब्यात देत आहोत, असे म्हटले. मात्र, जेवणाच्या सुटीत वकिलांसह आमदार नितेश राणे निघून गेले. याबाबत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दुपारच्या सत्रात आक्षेप घेत आरोपी शरण आला असल्याने त्याने कोर्टाच्या अधीन राहणे गरजेचे असल्याचे मत मांडले. यावर अॅड. मानशिंदे यांनी नितेश राणे यांची ही तांत्रिक सरेंडर होती, असे स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मंगळवारी (दि. 1 फेब्रुवारी ) याबाबत निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले. तूर्तास नितेश राणे यांना एक दिवसाची सवलत मिळाली आहे.

बोलताना सरकारी वकील

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब ( Santosh Parab Attack Case ) यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज ( Pre-arrest Bail Application ) फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात आज सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या तत्काळ अटकेची मागणी करण्यात आली. तर बचाव पक्षाने हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा मुद्दा मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी 3 वाजता याबाबतचा निकाल जाहीर करणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -Santosh Parab Attack Case : संतोष परब खुनी हल्ल्यातील आरोपी राकेश परब कणकवली पोलिसांना शरण

ABOUT THE AUTHOR

...view details