महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये कणकवलीत दुकाने सुरू, कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांची धावपळ - कणकवली न्यूज

जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू असल्याने कणकवलीत आज (सोमवार) पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यात 8 व्यापार्‍यांकडून दंड वसूल करण्यात आला.

shops open on lockdown period in Kankavali, administration action initiated
लॉकडाऊन असताना कणकवलीत दुकाने सुरू

By

Published : Jul 6, 2020, 7:35 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू असल्याने कणकवलीत आज (सोमवार) पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यात 8 व्यापार्‍यांकडून दंड वसूल करण्यात आला. पटवर्धन चौकातून ही कारवाई सुरू होताच बाजारपेठेतील विक्रेते आणि व्यापार्‍यांची मोठी धावपळ उडाली होती.

लॉकडाऊन असताना कणकवलीत दुकाने सुरू, कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांची धावपळ

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 2 ते 8 जुलै कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही कणकवली बाजारपेठेत काही हॉटेल, कपडे व इतर प्रकारची दुकाने खुली होती. त्यामुळे आज कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले तसेच नगरपंचायतीचे अधिकारी सतीश कांबळे यांच्या पोलीस आणि नगरपंचायत कर्मचार्‍यांनी बाजारपेठेत कारवाई सुरू केली. यात अत्यावश्यक सेवा वगळता सुरू असलेल्या अन्य दुकानांवर दंडात्मक कारवाई केली.

नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू होताच, बाजारपेठेत आलेले विक्रेते तसेच व्यापारी यांची मोठी धावपळ सुरू झाली. काही क्षणात उघडी असलेल्या या दुकानांची शटर्स तातडीने बंद करण्यात आली. तर बाजारपेठेत आलेले विक्रेतेही आपले दुकान आवरून पसार झाले. दरम्यान 8 व्यापारी आणि विक्रेत्यांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details