सिंधुदुर्ग- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हा बँकेचा वापर केला जात आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य यांना धमकावले जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करा; आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये देतो, अशा पद्धतीची ऑफर दिली जात असल्याचा आरोप भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
'जिल्हा परिषद अध्यक्षीय निवडणुकीसाठी सदस्यांना शिवसेनेकडून 25 लाखांची ऑफर' - राज्यसभा खासदार नारायण राणे
बँकेचे कर्ज घेतलेल्या आमच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून आपल्यावर जप्ती येऊ नये, यासाठी अध्यक्ष सतीश सावंत याना येऊन भेटा, असे सांगत आहेत. हा मतांसाठी सुरू असलेला शिवसेनेचा केविलवाणा प्रकार आम्ही हाणून पाडू,असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला.
शिवसेनेचा मतांसाठी केविलवाणा प्रयत्न-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणूकीती जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात बँकेचे कर्ज घेतलेल्या आमच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून आपल्यावर जप्ती येऊ नये, यासाठी अध्यक्ष सतीश सावंत याना येऊन भेटा, असे सांगत आहेत. हा मतांसाठी सुरू असलेला शिवसेनेचा केविलवाणा प्रकार आम्ही हाणून पाडू,असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला.
राणे यांनी घेतली बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट-
नारायण राणे पुढे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून केविलवाणे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात जिल्हा बँकेचा सुद्धा वापर केला जात आहे त्यामुळे ही नेमकी शेतकऱ्यांचीच बँक आहे का?,असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात आपण बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकार तात्काळ थांबवावा, असेही राणे म्हणाले. इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक सहा वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचे नेमके कारण काय?, असा सवाल करत याबाबत आपण चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर केले गंभीर-
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर नारायण राणे यांनी या वेळी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. संचयनीमध्ये भ्रष्टाचार केलेला हा माणूस शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवायला निघाला आहे. त्यांना विचारलं, का रे बाबा हा भ्रष्टाचार करतो? तर म्हणतो वरती शंभर कोटी घेतात. आम्ही पंचवीस घेतले तर काय झाले? म्हणजे त्यांना हे शिक्षण वरून मुख्यमंत्र्यांकडून, गृहमंत्र्यांकडून आहे आणि त्यांचा हेडमास्तर वाझे आहे. जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर वाझेंसोबतच यांना जेलमध्ये पाठवू, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.