महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ही तर सत्तेची गुर्मी... मनसेचा आंदोलनाचा इशारा - mp vinayak rauts son threatens kankavali police

शुक्रवारी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत आणि त्याचा एक सहकारी हे कारमधून दुपारच्या सुमारास मुंबईकडे जात होते. तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत मुख्य चौकात शिवीगाळ केली, हा सर्व प्रकार व्हिडिओत कैद झाला होता.

Parashuram Uparkar MNS leader Sindhudurg
मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर

By

Published : Jul 18, 2020, 3:30 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवली मुख्य चौकात वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्यासोबत खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत याने वादावादी केली. भर पावसात सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांना पोलिसांना शिवीगाळ करत त्रास देण्याचा प्रयत्न केला. या खासदारांच्या मुलावर गुन्हा दाखल होईल अथवा न होईल, पण याविरोधात मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा -'तुझी आता बदलीच करतो'; खासदार विनायक राऊतांच्या पुत्राची पोलिसांना धमकी

नेमके प्रकरण काय ?

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवली मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिली. तुझी आता बदली करतो, तू मला ओळखत नाहीस, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय? तुझी हिम्मतच कशी झाली. तुला माझा इंगा दाखवतोच, अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना व्हिडिओत रेकॉर्ड झाली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरुरकर, मेघन सरगळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात शिवसेना सत्ताधारी मुजोरपणा करत आहेत. याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना जनता जास्त काळ सहन करणार नाही, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

कणकवली उड्डाण पूल संरक्षण भिंत कोसळली. या घटनेची पाहणी मुख्य अभियंता देशमाने व गोरे यांनी कोणालाही कल्पना न देता का केली ? हा अहवाल देणारे पालकमंत्री यांच्याच खात्याचे असल्याचे उपरकर यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा -फडणवीसांच्या दिल्लीतील गाठी-भेटी सुरूच; मोदी-शाह यांच्या भेटीनंतर आज भाजपाध्यक्षांना भेटणार

ABOUT THE AUTHOR

...view details