महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pratap Sarnaik Issue : प्रताप सरनाईकांच्या पत्रामागे 'ईडीचा' कुटील डाव - विनायक राऊत

मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचे हा ईडीचा कुटील डाव आहे. अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. सरनाईक यांना जो काही त्रास होत आहे त्याच्या मुळाशी जाणे गरजेच आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने ईडी त्रास देत आहे, तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी टीका त्यांनी केली.

By

Published : Jun 22, 2021, 5:51 PM IST

राऊत
राऊत

सिंधुदुर्ग - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik Issue) यांनी भाजपाशी जुळवून घ्या, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर आणि पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपा शिवसेना एकत्र येणार असल्याच्या राज्यात चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सिंधुदुर्गात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भाजपाच्या युतीबाबत मौन राखत संदिग्धता कायम ठेवली आहे. तर सरनाईकांचे पत्र हा मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणण्यासाठी ईडीचा कुटील डाव असल्याचेही ते म्हणाले आहे.

खासदार विनायक राऊत

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनापासून आभार'

सिंधुदुर्गात आज (मंगळवारी) माध्यमांशी बोलताना शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा शिवसेना भाजपा युतीवर बोलताना अत्यंत संदिग्ध अशी प्रतिक्रिया दिली आहे. युती होणार किंवा नाही याबाबत ठोस असे उत्तर त्यांनी दिले नाही. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपा यांच्यावर टीकाही केली. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे राऊत म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे मोदींचे मनापासून आभार. यात पंतप्रधानांचा मोठेपणा आहे, असेही ते म्हणाले. यामुळे चर्चेला एकच उधाण आले आहे.

'सरनाईकांचे पत्र हा मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणण्यासाठी ईडीचा कुटील डाव'

विनायक राऊत यांनी यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा समाचार घेतला. त्यांचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. प्रताप सरनाईकांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावायचा, सीबीआयचे प्रेशर आणायचे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घ्यायचे. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचे हा ईडीचा कुटील डाव आहे. अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. सरनाईक यांना जो काही त्रास होत आहे त्याच्या मुळाशी जाणे गरजेच आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने ईडी त्रास देत आहे, तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी टीका त्यांनी केली.

'चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना शहाणपणा शिकवू नये'

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, कि त्यावेळी भाजपा-शिवसेनेची युती नैसर्गिक होती. पण त्यावेळेला बेईमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला भाजपाकडून दूर व्हावे लागले. चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही. स्वतःच्या बुडाखाली जे काही जळतंय ते आधी सांभाळा. संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय, एनआयएचा ससेमिरा लावायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हा एकमेव धंदा केंद्र सरकारने चालू केलेला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -लेटरबॉम्बने महाराष्ट्र ढवळून काढणारे प्रताप सरनाईक यांचा प्रवास, रिक्षाचालक ते तीनवेळा आमदार

ABOUT THE AUTHOR

...view details