महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma Andhare : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मालवणच्या समुद्रात चालवली बोट - सुषमा अंधारे  सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Shiv Sena leader Sushma Andhare ) यांनी मालवण चिवला बीच ( Malvan Chiwala Beach) किनारपट्टीवरून समुद्र सफर ( Sushma Andhare sea voyage ) केली. पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांच्या कडून माहिती जाणून घेत स्वतः बोट चालवण्याचा आनंद ( Sushma Andhare enjoyed boating. ) लुटला.

Etv BharatSushma Andhare

By

Published : Nov 23, 2022, 11:01 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Shiv Sena leader Sushma Andhare ) यांनी मालवणच्या समुद्रात स्वतः बोट चालवत समुद्र पर्यटनाचा आनंद ( Andhare enjoyed boating in Malvan sea ) लुटला आहे. आधीच डॅशिंग महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या अंधारे यांचा थेट समुद्रात सर्वांनीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या नव्या पैलूचा अनुभव घेतला ( Sushma Andhare enjoyed boating. ) आहे.

सुषमा अंधारे सिंधुदुर्ग दौऱ्यावर - विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांची छोटी कन्या कबीरा ही देखील उपस्थित होती. सिंधुदुर्ग दौऱ्यावर ( Sushma Andhare on Sindhudurg tour ) असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मालवण चिवला बीच किनारपट्टीवरून समुद्र सफर केली. पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांच्या कडून माहिती जाणून घेत स्वतः बोट चालवण्याचा आनंद लुटला. यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी याही उपस्थित होत्या.

मालवणचे निसर्ग सौंदर्याचे केले कौतुक - बाबी जोगी यांच्या निवासस्थानी मालवणी पाहुणचार, मालवणी खाद्यसंस्कृतीचा सुषमा अंधारे यांनी आस्वाद घेतला. यावेळी पारंपारिक मच्छिमार यांच्या विविध समस्या जाणून घेत, पर्ससीन एलईडी लाईट मासेमारी लढ्याविषयीही माहिती बाबी जोगी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून जाणून घेतली.

मालवणी खाद्यसंस्कृती सुषमा अंधारेंनी घेतला स्वाद -शिवसेनेतील पडझडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्यांच्या केंद्रस्थानी सुषमा अंधारे यांचे नेतृत्व प्रकर्षाने समोर आले. सुषमा अंधारे यांची सध्या महाराष्ट्रभर महा प्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रभर राजकीय विरोधकांच्या विरोधात मोठे रान पेटवले आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी कणकवली येथे झालेल्या सभेमध्ये भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका करताना अंधारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पातळीवरचे वैचारिक आंदोलन निर्माण केले आहे. दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या अंधारे सध्या जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घेतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी देखील घेत आहेत.

वैचारिक आंदोलन निर्माण -आज त्या मालवणमध्ये होत्या आणि या ठिकाणी त्यांनी समुद्रसपारी दरम्यान बोट चालवण्याचा आनंद घेतला आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी मालवण मधील स्वच्छ बीचचे कौतुक केले. यापूर्वी देखील आपण मालवणमध्ये आलो होतो. तवे मालवण माझ्या अत्यंत आवडीचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details