महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitesh Rane Threaten Case नितेश राणेंना धमकी प्रकरण भोवणार, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने केली तक्रार - नितेश राणेंकडून आचार संहितेचा भंग

नांदगाव येथील सभेत आमदार नितेश राणे ( Nitesh Rane Threat To People In Sindhudurg ) यांनी ग्रामस्थांना धमकी वजा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) गटाच्या शाखा प्रमुखाने कणकवली पोलीस ठाणे ( Kankavli Police Station ) आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nitesh Rane Threaten Case
भाजप आमदार नितेश राणे

By

Published : Dec 14, 2022, 3:55 PM IST

सिंधुदुर्ग - माझ्या विचाराचा सरपंच द्या अन्यथा गावाला निधी देणार नसल्याचा इशारा वजा धमकी आमदार नितेश राणे ( Nitesh Rane Threat To People In Sindhudurg ) यांनी नागरिकांना दिली होती. याप्रकरणी आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) राजा म्हसकर यांनी केली आहे. अन्यथा नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी आचारसंहितेचा केला भंगसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक ( Nandgaon Gram Panchayat Election ) १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहे. भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेले रविराज मोरजकर यांचा प्रचार करण्यासाठी कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे ११ डिसेंबरला नांदगाव येथे आले होते. यावेळी नांदगाव तिठा येथे प्रचार सभेत भाषण करताना आमदार नितेश राणे ( Nitesh Rane Threat To People In Sindhudurg ) यांनी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, माझ्या अधिकाराखाली आहेत. आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” असा इशारा वजा धमकी सर्वांसमक्ष दिली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. आचार संहितेच्या कालावधीत अश्या प्रकारची धमकी देऊन नितेश राणे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या सदर वक्तव्याची नांदगाव ग्रामस्थांमध्ये भयंकर चीड व दहशत निर्माण झाल्याची तक्रार राजा म्हसकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तर करणार आंदोलनआचार साहितेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) करण्यात यावा अशी मागणी राजा मसकर यांनी केली आहे. जर नितेश राणे यांच्यावर कारवाई केली नाही, तर नांदगाव ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजा म्हसकर यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details