महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sawantwadi Election : कोकणात ठाकरेंना मोठा धक्का, 'या' निवडणुकीत युतीचा एक हाती विजय

कोकणात उद्धव ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेची सत्ता असलेल्या सावंतवाडी खरेदी विक्री संघ निवडणुकीत (Sawantwadi kharedi vikri sangh election) भाजप व शिंदे गटाच्या युतीचा एक हाती विजय झाला आहे. (shinde bjp yuti won).

Sawantwadi Election
Sawantwadi Election

By

Published : Nov 13, 2022, 5:53 PM IST

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथे आज झालेल्या सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (Sawantwadi kharedi vikri sangh election) बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या युतीने कोकणात प्रथमच खाते उघडले आहे. (shinde bjp yuti won). त्या ठिकाणी १५ पैकी १५ युतीच्या जागा निवडून आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला या ठिकाणी पराभव सहन करावा लागला आहे. यातील एक जागा प्रथमच बिनविरोध झाली होती. १४ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत आज सर्व जागा युतीच्या ताब्यात गेल्या आहेत.

दोन्ही गटाने निवडणुक केली होती प्रतिष्ठेची - शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या होम पीचवर सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली. शिवसेनेतील दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडीने सावंतवाडी खरेदी-विक्री संघावरील आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पदाला लावली होती. तर खरेदी विक्री संघ आपल्याकडे यावा यासाठी भाजपा व शिंदे गट शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी केली होती. हा कोकणातील पहिलाच विजय असल्यामुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला व यापुढे जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने आमचीच असतील, असा दावा केला आहे. खरेदी विक्री संघात निवडून देणाऱ्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details