सावंतवाडी- टेम्पो ट्रॅव्हलर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत सावंतवाडीतील पाच तर इचलकरंजीतील दोघे जखमी झाले. हा अपघात आंबोली-फणसवाडी येथे सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात अल्टो कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
आंबोलीत टेम्पो ट्रॅव्हलर व अल्टो कारची समोरा-समोर धडक; ७ जण जखमी - अल्टो कार
हा अपघात आंबोली-फणसवाडी येथे सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात अल्टो कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अल्टो कारमधील परेश लक्ष्मण बावकर, रुपेश विष्णू कावले, अभिजीत मनोहर बावकर, गोपाळ शशिकांत नाईक व अमोल नाईक (सर्व रा. सावंतवाडी) हे प्रवासी जखमी झाले आहेत. यातील अभिजीत बावकर यांच्या पायाला तर रुपेश यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त टेम्पो ट्रॅव्हलरमधील अश्विनी दत्ताराम मगदूम, पद्मिनी तानाजी दिंडे (रा. इचलकरंजी) या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी प्रथम आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सावंतवाडीत हलवण्यात आले आहे.