महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिरमचे ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, शनिवारी लसीकरण - सिंधुदुर्ग

कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम शनिवारी (16 जानेवारी) होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध झाले आहे. ओरोस येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ओरोस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन संस्थांमध्ये सुरू होत आहे.

व्हॅक्सिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
vaccine introduced in Sindhudurg

By

Published : Jan 14, 2021, 8:17 PM IST

सिंधुदुर्ग - कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल झाली आहे. कोल्हापूर येथून वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर हे आज संध्याकाळी लस घेऊन जिल्ह्यात दाखल झाले.

जिल्ह्यात 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध
कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम शनिवारी (16 जानेवारी) होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध झाले आहे. ओरोस येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ओरोस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन संस्थांमध्ये सुरू होत आहे.

प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन
या तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुभारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी 100 कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्य याबाबतची पूर्वतयारी संस्थास्तरावर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडार शितगृहांमध्ये लसीची साठवणूक
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडार येथील शितगृहांमध्ये सध्या या लसीची साठवणूक करण्यात आली आहे. लस जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी डॉ. संदेश कांबळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर यांच्यासह औषध भांडार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details