महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंचांना मिळणार ५ लाखांचे विमा कवच - सरपंचांना विमा

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना ५ लाखांचे विमा कवच देण्यात येणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

uday samnt
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंचांना मिळणार ५ लाखांचे विमा कवच

By

Published : May 31, 2020, 3:45 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोनाच्या महामारीत गाव पातळीवर मुंबईतून येणाऱ्या चाकरमानी लोकांची व्यवस्था करण्यात गावचे सरपंच मुख्य भूमिका बजावत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील अशा सर्व सरपंचांना 5 लाखाचे विमा कवच देणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

दोन्ही जिल्ह्यातील सरपंचांनी मुंबईकर चाकरमानी लोकांची गावच्या शाळेत, मंदिर, समाज मंदिरात राहायची व्यवस्था केली आहे. हे काम करत असताना कोविड योद्धा म्हणून कोणतीही भीती न बाळगता सरपंच आपले काम सेवाभावी वृत्तीने पार पाडत आहेत. अशावेळी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन सरपंच कोरोना प्रभावित होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सामंत यांनी सांगितले.

याबाबत आपले विमा कंपन्याशी बोलणे झाले असून लवकरच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून सरपंचांचा विमा फॉर्म भरून घेतला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details