सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच असून, सर्वत्र भात रोपे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. अशातच लावणी करताना काही शेतकरी पारंपारिक गाणी गाताना पाहायला मिळत आहेत. सावंतवाडी माजगाव येथील महिला तरवा काढताना आणि भाताची लावणी करताना अशीच गाणी गाताना दिसुन आल्या आहेत. लावणी करताना थकवा दूर व्हावा हा या गीत गाण्या पाठिमागचा हेतू असतो.
तळकोकणात पारंपरिक गीतांसह सामूहिक भात लावणीची लगबग!
तळकोकणात सध्या चांगलाच पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामालाही वेग आला आहे. सध्या सर्वत्र भात रोपे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. अशावेळी अनेक ठिकाणी लावणी करताना सामूहिकरित्या पारंपरिक गाणी गायली जातात.
आधुनिक काळात परंपरेची जपणूक व जोपासना करण्याचे कार्य खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गाकडूनच केले जाते. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी माजगाव इथे देखील काही शेतकरी महिला अशी पारंपरिक गीत गाताना दिसत आहेत. त्यांनी ही गाणी त्यांच्या आई किंवा आजीकडून शिकलेली आहे. काहींनी या गीतांचे शब्द ऐकून ऐकून आठवणीत ठेवलेले आहेत. शहरात गेल्याने अशा परंपरांची तसेच शेतीबद्दल फारशी माहिती नसते मात्र या ठिकाणी आल्यावर इतर महिलां समवेत शेतात काम केल्यानंतर शेतीची ओळख आणि आवड निर्माण होते, असे काही महिलांनी सांगितले.