सिंधुदुर्ग - महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. ठिकठिकाणच्या संरक्षक भिंती खचल्या आहेत. महामार्गाला तडे जाण्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे धोकादायक महामार्गाची तातडीने दुरूस्ती व्हायला हवी. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला तर आम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
...तर रस्त्यावर उतरुन महामार्गाचे काम बंद पाडू, ठेकेदारांना नगराध्यक्षांचा इशारा
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. ठिकठिकाणच्या संरक्षक भिंती खचल्या आहेत. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला तर आम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात नगरसेवक, महामार्ग ठेकेदार प्रतिनिधी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, अजय गांगण, दिलीप बिल्डकॉनचे राजवर्धन परिहार, उदयसिंग चौधरी आदी उपस्थित होते.
Last Updated : Jun 24, 2020, 4:56 PM IST