सिंधुदुर्ग- राष्ट्रीय छात्र सेनेच्या ५८ महाराष्ट्र बटालीयनचा शुक्रवारी दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेचे अतिरिक्त महासंचालक गजेंद्र प्रसाद यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने बटालियनचा शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या रूपाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, ब्रिगेडीयर आर. बी. डोंगरा, कर्नल देवेन भारद्वाज, लेफ्टनंट कर्नल सी.पी. उन्नीकृष्णन आदी उपस्थित होते.