महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : संतोष परब खुनी हल्ल्यातील आरोपी राकेश परब कणकवली पोलिसांना शरण - संतोष परब खुनी हल्ल्या प्रकरण

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्या प्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा खासगी सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलिसांना शरण ( Rakesh Parab in Kankavli police ) आला आहे. कणकवली पोलीस त्याची बंद खोलीत चौकशी करत आहेत.

Santosh Parab Attack Case
राकेश परब

By

Published : Jan 31, 2022, 12:12 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा खासगी सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलिसांना शरण ( Rakesh Parab in Kankavli police ) आला आहे. कणकवली पोलीस त्याची बंद खोलीत चौकशी करत आहेत.

राकेश परब

राकेश परब यांचे 38 कॉल आढळले होते -

जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर 2021 रोजी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पुणे येथील सचिन सातपुते नामक आरोपीला अटक करण्यात आली होती. हा संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले. सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परब याचे 38 कॉल रेकॉर्ड आढळून आले, या पार्श्वभूमीवर या हल्ल्याप्रकरणी राकेश परब याला सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. सरकार पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी जिल्हा न्यायालयात राकेश परब यांच्या कॉल रेकॉर्डचे डिटेल्स सादर केले होते. राकेश परब हा घटना घडल्यानंतर फरारी होता. त्याचा कणकवली पोलीस शोध घेत होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश परब याने धाव घेतली होती, मात्र जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान सोमवारी राकेश परब कणकवली पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी चौकशी केली.

हेही वाचा -Nitesh Rane in Sindhudurg Court : आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details