सिंधुदुर्ग -शिवसेनेकडून वारंवार डावलण्यात येत असल्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना राजकीय वैफल्य आले आहे, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. केसरकर आजारी आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात असले तरी, त्यांना शारीरिक नाही, तर राजकीय आजार झालेला आहे. त्यामुळे ते दूर आहेत, असेही राजन तेली म्हणाले.
आमदार दीपक केसरकर वैफल्यग्रस्त, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका - rajan teli criticized deepak kesarkar
शिवसेनेकडून वारंवार डावलण्यात येत असल्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना राजकीय वैफल्य आले आहे, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. जिल्ह्यात कोरोनाचे संकट असताना केसरकर कुठेच दिसले नाहीत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणीही केसरकर यांना त्यांच्याच पक्षातील लोकांनी डावलले असल्याचे दिसून येत आहे, असेही तेली म्हणाले.
मागील चार ते साडेचार महिने केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत कोणी काही बोललं तर ते आजारी असल्याने मतदार संघात येत नाहीत, असे सांगण्यात येते. मात्र, त्यांचा आजार नक्की कसला आहे. मुंबईतील काही बैठकांना ते उपस्थित असल्याचे दिसून येते, जिल्हा प्रशासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देखील ते सहभागी असतात. शिवसेनेने त्यांना एकाकी पाडल्याने केसरकर जिल्ह्यात येत नसल्याचे राजन तेली म्हणाले.
सध्या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज असताना माजी पालकमंत्री असलेले केसरकर जिल्ह्याबाहेर राहून नेमके काय करत आहेत, हा प्रश्न आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट असताना केसरकर कुठेच दिसले नाहीत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणीही केसरकर यांना त्यांच्याच पक्षातील लोकांनी डावलले असल्याचे दिसून येत आहे, असेही तेली म्हणाले.