सिंधुदुर्ग :महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यावरून राजकारण तापलेले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून टीका केली होती. तेव्हा आजारी होतात, आता बरं बाहेर पडलात, अशा शब्दात राज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर मी बाहेर फिरत असल्याने काही लोकांच्या पोटात गोळा आला असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आजपासून कोकण दोऱ्यावर आहेत. (Raj Thackeray criticize Sharad Pawar).
Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच राज्यात जातीय राजकारणाला सुरुवात - राज ठाकरे - राज्यात जातीय राजकारणाला
राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच राज्यात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. (caste politics in Maharashtra). शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. (Raj Thackeray criticize Sharad Pawar).
समान नागरी कायद्याची मागणी पहिल्यापासूनची : या सोबतच राज ठाकरे यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केलं. समान नागरी कायदा असा महाराष्ट्रात आणता येत नाही. तो देशात आणता येतो. एका राज्यासाठी कायदा नसतो. हा कायदा देशभरात लागू करण्याचं केंद्र ठरवतं. त्यानंतर संपूर्ण राज्यांना हा कायदा लागू होतो. तो आला पाहिजे. ही आमची पहिल्यापासून मागणी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
पवारांनी महाराजांचं नाव कधीच घेतलं नाही : सध्या राज्यात जातीचं राजकारण सुरू असून या जातीय राजकारणाची सुरवात 1999 साली एनसीपीच्या जन्मापासून झाली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आलं, असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.