सिंधुदुर्ग- कसाब जसा दहशदवादी होता, तशीच ही साध्वी दहशतवादी आहे. दहशतवाद संपवला म्हणणारे पंतप्रधान दहशतवाद्यालाच उमेदवारी देतात, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी प्रज्ञा सिंहांच्या उमेद्वारीवरून मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते कुडाळ येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते.
मोदींनी दहशतवाद्याला उमेदवारी दिली, ते दहावी नापास; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - उमेदवारी
दहशतवाद संपवला म्हणणारे पंतप्रधान दहशतवाद्यालाच उमेदवारी देतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच मोदी दहावी नापास असल्याचा गंभीर गौप्यस्फोटही त्यांंनी केला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांच्या प्रचारासाठी आंबेडकर सिंधुदुर्गात आले होते. कुडाळ येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी हुतात्मा करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरदेखील आंबेडकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदी दहावी नापास असल्याचा गंभीर गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला. विशेष म्हणजे मोदींना शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.