सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा, औषध पुरवठा याबाबत आढावा घेतला. तसेच अतुल रावराणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या पीपीई कीटचे वाटप केले. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या केंद्रांना कोणतीही मदत लागल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधावा आपण मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून पीपीई कीटचे वाटप - सिंधुदुर्ग कोरोना अपडेट्स
ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या केंद्रांना कोणतीही मदत लागल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधावा आपण मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून पीपीई कीटचे वाटप
दरम्यान, यावेळी पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ. नालंदा काजरेकर, डॉ. अश्विनी खोत, जि.प.गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, बाळू पालव, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, तानाजी पालव उपस्थित होते, तर वालावल प्रा.आ.केंद्रात डॉ. एच. एस.शिंगटे, डॉ. के.एस.पराडकर, अतुल बंगे, पं.स.सदस्य प्राजक्ता प्रभू, नेरूर सरपंच शेखर गावडे, कवटी सरपंच रुपये वाडयेकर, मंजुनाथ फडके आदी उपस्थित होते.