महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्तेचा माज असू नये, सत्ता ही कायमची नसते - प्रमोद जठार - gitesh raut clashesh with police news

पोलीस, डाॅक्टर, नर्सेस हे कोव्हिडच्या या काळात जिवाची बाजी लावून काम करताहेत. त्यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना, त्यांना वाईट वागणूक देणाऱ्यांना येथील जनता माफ करणार नाही. जेव्हा जेव्हा मला डॉक्टर, नर्स, पोलीस दिसतात तेव्हा त्यांना आदराने नमस्कार करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

BJP leader Pramod Jathars reaction
सत्तेचा माज असू नये, सत्ता ही कायमची नसते - प्रमोद जठार

By

Published : Jul 20, 2020, 8:27 AM IST

सिंधुदुर्ग - सत्तेचा माज कोकणातील जनतेने त्या-त्या वेळी उतरवला आहे. त्यामुळे सत्तेचा माज कोणीही करू नये, सत्ता ही कायमची नसते, अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याचा पोलिसांसोबत वाद झाला होता. त्याप्रकरणावर बोलताना त्यांनी ही राऊत यांच्या वागणुकीवर निशाणा साधला आहे.

जठार म्हणाले, तो कोणाचाही मुलगा असूदे नाहीतर अन्य कोणी. कोकणची ही संस्कृती नाही. एकवेळ हे प्रकरण अन्य मार्गाने मिटवले जाईल, तडजोड केली जाईल. मात्र सिंधुदुर्गातील जनता हे बघतेय. 'ये लोग सब जानते है. तसेच पोलीस, डाॅक्टर, नर्सेस हे कोव्हिडच्या या काळात जिवाची बाजी लावून काम करताहेत. त्यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना, त्यांना वाईट वागणूक देणाऱ्यांना येथील जनता माफ करणार नाही. जेव्हा जेव्हा मला डॉक्टर, नर्स, पोलीस दिसतात तेव्हा त्यांना आदराने नमस्कार करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सत्तेचा माज असू नये, सत्ता ही कायमची नसते - प्रमोद जठार
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने (शनिवार) कणकवली शहरातील मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तुझी आता बदली करतो, तू मला ओळखत नाहीस, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय? तुझी हिम्मतच कशी झाली. तुला माझा इंगा दाखवतोच, अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून ते पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करत असल्याची सर्व घटना व्हिडिओत रेकॉर्ड झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना जठार बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details