सिंधुदुर्ग Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Rajkot Fort : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, ४ डिसेंबर) सिंधुदुर्ग (PM Narendra Modi in Sindhudurg) जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. ते 'भारतीय नौदल दिना'निमित्त (Indian Navy Day) आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. हा पुतळा भारतीय नौदलानं बसवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच तीनही दलांचे प्रमुख, नौदलाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण : भारतीय 'नौदल दिना' निमित्तानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात आली. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस 'नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो.