सिंधुदुर्ग- सरकारने लाॅकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिली. त्यामुळे रस्त्यावर पुन्हा गर्दी होताना दिसत आहे. कणकवली शहरात गेले दोन दिवस गर्दी होत आहेत. नागरिक घराबाहेर पडत असून बाजारात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
कणकवलीत ग्राहकांची गर्दी.. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! - sindhudurg liquor news
कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी येतात. गेले अनेक दिवस येथील मार्केट पूर्णतः बंद होते. मात्र, लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे.
हेही वाचा-बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे याठीकाणी मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी येतात. गेले अनेक दिवस येथील मार्केट पूर्णतः बंद होते. मात्र, लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे. तर आजपासून शहरात मद्यांची दुकानेही खुली करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मद्यपींची सोय झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून घरात बसून असलेले तळीराम घराबाहेर पडले आहेत.