सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावानंतर जंगली हत्तीने आपला मोर्चा मोर्ले गावाकडे वळवला आहे. या हत्तींचा येथील लोकांनी थरार अनुभवला आहे. हत्तीच्या मुक्त वावरामुळे सध्या या भागात दहशत पसरली आहे. या हत्तीने येथील युवकांचा पाठलाग केला आणि सर्वांचे धाबे दणाणले.
सिंधुदुर्ग : केरनंतर टस्कर हत्तीचा मोर्चा आता मोर्ले गावाकडे; नागरिकांमध्ये दहशत - टस्कर हत्तीची सिंधुदुर्गमध्ये दहशत
तिलारी खोऱ्यातील केर गावानंतर जंगली हत्तीने आपला मोर्चा मोर्ले गावाकडे वळवला आहे. या हत्तींचा येथील लोकांनी थरार अनुभवला आहे. हत्तीच्या मुक्त वावरामुळे सध्या या भागात दहशत पसरली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा हत्तीचा थरार पाहायला मिळाला. तिलारी खोऱ्यातील मोर्ले या गावात युवकांचा पाठलाग करत टस्कर हत्ती मंदिरापर्यंत घुसला. मोर्ले गावात टस्कर हत्तीची दहशत असल्याने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. चिंकारी फोडत मोर्ले गावतील मंदिराच्या बाजुला हत्ती धडकला. मंदिरात बसलेले ग्रामस्थ थोडक्यात बचावले. टस्कर हत्तीची ही जबरदस्त खुन्नस पाहून तिलारी खोऱ्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.