महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 29, 2021, 10:24 PM IST

ETV Bharat / state

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला, आठ घरांचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे. परिणामी खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे. परिणामी खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला, आठ घरांचे नुकसान

८ ते १० घरांचे नुकसान
कळणे मायनिंग परिसरात मातीचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणच्या ८ ते १० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका घराची भिंत कोसळली आहे. दरम्यान परिसरात आलेले पाणी तूर्तास उतरले असले तरी भीती मात्र कायम आहे. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत नेमका हा प्रकार कसा घडला याचा शोध सुरू केला आहे.

संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना केले पाचारण
यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान लोकांना त्रास होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना त्यांना देण्यात येणार असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या पाण्याचा प्रवाह आता ओसरला आहे, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

कळणे मायनिंग प्रकल्पाला झाला होता मोठा विरोध
कळणे येथे मायनिंग प्रकल्पाला मोठा विरोध झाला होता. यासाठी झालेले आंदोलन राज्यभर गाजले. मात्र हा प्रकल्प स्थानिकांकडून विरोध असूनही पुढे रेटून नेण्यात आला. आता येथे डोंगर पोखरून खनिज काढण्यात आले आहे. याचा मोठा फटका आजच्या दुर्घटनेने बसला. उत्खननामुळे डोंगरात मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात मोठा जलसाठा होता. हे पाणी खाली असलेल्या वस्तीत जावू नये म्हणून भिंत घातली होती.

दरडी पाण्यात कोसळून या भिंतीला पडले भगदाड -
पावसामुळे उत्खननात तयार झालेल्या दरडी पाण्यात कोसळून या भिंतीला भगदाड पडले. सुरुवातीला लहान प्रवाह सुरु झाला. यानंतर स्थानिक जमले. खाली असलेल्या धोक्याच्या टप्प्यातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवायला सुरुवात केली. सकाळी ९ च्या सुमारास मोठा आवाज होऊन मोठे पाण्याचे लोट बाहेर पडू लागले. तीन तासाहून अधिक काळ पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता. खनिज प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. ग्रामस्थांनी घरातील, शेतातलील महिला, मुले वयोवृद्धांना बाहेर काढले. यात उगाडे-कळणे रस्ता वाहून गेला आहे.

हेही वाचा -राज्यातील हे २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details