महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षक दिनानिमित्त सिंधुदुर्गात शिक्षकांची सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षकांनी स्वनिधीतून तब्बल 44 लाखांचा अद्ययावत ऑक्सिजन प्लांट आणि 35 बेडचे कोविड सेंटर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

f
f

By

Published : Sep 5, 2021, 3:43 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात शिक्षक दिनी शिक्षकांनी सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट दिली आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शिक्षकांनी ऑक्सिजन प्लांट आणि अद्ययावत कोरोना वॉर्ड उभारला असून रविवारी (दि. 5 सप्टेंबर) शिक्षक दिनी या प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त सिंधुदुर्गात शिक्षकांची सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारले 35 बेडचे कोविड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षकांनी स्वनिधीतून तब्बल 44 लाखांचा अद्ययावत ऑक्सिजन प्लांट आणि 35 बेडचे कोविड सेंटर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नितीन कदम, कणकवली तहसीलदार आर.जे. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक समितीच्या माध्यमातून 46 लाखांचा उभारला निधी

उद्घाटनानंतर शासकीय रुग्णालयाला हा ऑक्सिजन प्लांट व कोरोना वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले आहे. पीएसए पद्धतीच्या या ऑक्सिजन प्लांट मधून 333 लिटर प्रति मिनिट इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला केला जाणार आहे. याबरोबरच 35 बेड्ससह सुसज्ज कोविड कक्षही याठिकाणी तयार करण्यात आला आहे. "देशासह राज्यात प्रथमच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून 46 लाख रुपये निधी यासाठी गोळा केला गेला. मात्र, मध्यंतरी नैसर्गिक उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. याचा फायदा कोरोनासह इतर सर्व रुग्णांनाही होणार आहे, असे मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं ? - आमदार वैभव नाईक

ABOUT THE AUTHOR

...view details