सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चाकरमान्यांना विरोध वाढतच आहे. काल सरपंच संघटनेने विरोधाची भूमिका घेतल्याने आता सर्वपक्षीय नेत्यांनी कुडाळ येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देत चाकरमान्यांना गावी आणू नका, अशी मागणी केली आहे.
कोरोना भीती : सिंधुदुर्गात चाकरमान्यांना विरोध कायम - corona in sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जिल्ह्यासह सध्या कोकणात चाकरमान्यांना गावी आणण्यावरून मोठा विरोध केला जात आहे. या विरोधामुळे कोकणात नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
चाकरमान्यांना गावी आणण्यावरून सध्या जिल्ह्यात विरोध वाढत चालला आहे. कुडाळमधील सर्वपक्षीय नेत्यांनी प्रांताधिकारी वंदना करमाळे यांची भेट घेऊन विरोध दर्शवला. रेडझोनमधून आलेल्या चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिल्यास जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल व जिल्हा रेडझोनमध्ये जाईल. येथील आरोग्य यंत्रणा संक्षम नसताना चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जिल्ह्यासह सध्या कोकणात चाकरमान्यांना गावी आणण्यावरून मोठा विरोध केला जात आहे. या विरोधामुळे कोकणात नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.