सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. कणकवलीत या महामार्गाच्या बाजूला उभी असलेली अनेक बांधकामे पाडण्यात आली आहेत. यातील काही बांधकामाची पूर्ण नुकसान भरपाई देऊनही ही बांधकामे अर्धवट पणे उभी आहेत. अशी धोकादायक बांधकामे पाडण्यात यावेत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदाराला दिले आहेत.
पालकमंत्र्यांनी दिले मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश - उदय सामंत लेटेस्ट न्यूज
कणकवली येथे हायवे ठेकेदार कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची पालकमंत्री सामंत यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळे सामंत यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश दिले.
कणकवली येथे हायवे ठेकेदार कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची पालकमंत्री सामंत यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळे सामंत यांनी धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश दिले. या बैठकीला आमदार वैभव नाईक, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आदी उपस्थित होते. महामार्गलगतच्या अनेक इमारती या अर्धवट स्थितीत उभ्या आहेत. त्यात काहींची दुकाने सुरू असून या इमारती धोकादायक असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले. याबाबत तत्काळ कारवाई करावी, असे पालकमंत्री म्हणाले.