महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू - Sindhudurg corona patients

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान म्रृत्यू झाला आहे. या महिलेस मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

Sindhudurg corona update
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू

By

Published : Jun 4, 2020, 9:35 PM IST

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत ६३ वर्षीय महिला ही देवगड तालुक्यातील शिरगाव येथील होती. या महिलेस मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

पनवेल येथून आलेल्या या महिलेचा स्वॅब २८ मे रोजी तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल २ जून रोजी प्राप्त झाला होता.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि चौकुळ या गावातील हे दोन रुग्ण आहेत. तर काल जिल्ह्यात ६ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ३, सावंतवाडी तालुक्यातील १, वैभववाडी तालुक्यातील १, देवगड तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details