सिंधुदुर्ग –जिल्ह्यात आज आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. 27 वर्षांच्या या रुग्णाने मुंबई येथून प्रवास केला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. बाधित क्षेत्रातून आला असल्याने 5 मे 2020 रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्यास कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
सिंधुदुर्गात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला - sindhudurg lockdown
बाधित क्षेत्रातून आला असल्याने 5 मे 2020 रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्यास कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
![सिंधुदुर्गात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला सिंधुदुर्गात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7104100-607-7104100-1588861974517.jpg)
सिंधुदुर्गात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला
दरम्यान, सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 झाली असून त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे, तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.