महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या शेकडो पिल्लांना सोडले समुद्रात - कासव बातमी

वेंगुर्ले वायंगणी किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संरक्षित केलेल्या अंड्यातून सुमारे 149 पिल्ले वायंगणी येथील समुद्र किनारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली आहेत.

Olive Ridley baby turtles released at sea at Sindhudurg district
कास समुद्रात सोडताना

By

Published : Mar 24, 2021, 3:07 PM IST

Updated : Mar 24, 2021, 3:53 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्ले पाहायला मिळत आहेत. नुकतीच वेंगुर्ले तालुक्यात कासवांची शेकडो पिल्ले कासव प्रेमींनी समुद्रात सोडली.

सिंधुदुर्गात दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या शेकडो पिल्लांना सोडले समुद्रात

कासवांची 149 पिल्ले सोडली समुद्रात

वेंगुर्ले वायंगणी किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संरक्षित केलेल्या अंड्यातून सुमारे 149 पिल्ले वायंगणी येथील समुद्र किनारी नैसर्गिक अधिवासात सोडली. यावेळी वनविभागाचे अधिकारी विष्णू नरळे, सावळा कांबळे, उपजिल्हाधिकारी वर्षा शिगण, न्यायाधीश विनायक पाटील, तहसीलदार प्रवीण लोकरे आदींनी या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांची माहिती घेतली.

कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी केली होती अंडी संरक्षित

कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी वनविभागाच्या सल्ल्याने कासवांची अंडी दोन ठिकाणी किनारी भागात संरक्षित केली होती. त्यातील कासवांची 149 पिल्ले बाहेर आली व त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडण्यात आले. यावेळी बोलताना सुहास तोरसकर म्हणाले दोन घटनांमध्ये आम्ही या कासवांची अंडी संरक्षित केली होती. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली संरक्षित केल्या अंड्यांमधून कासवांची पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना आम्ही समुद्रात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

या कारणासाठी होते कासवांची शिकार

मांसाशिवाय कवचासाठीसुद्धा कासवांची शिकार केली जाते. त्यामुळे सुहास तोरसकर यांच्यासारख्या कासव प्रेमी नागरिकांनी येथील किनाऱ्यावर त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही वर्षात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात अंडी घालण्यासाठी वायंगणी-वेंगुर्ले, तांबळडेग-देवगड या किनाऱ्यांवर येत आहेत. वन विभागाच्या सहकार्याने कासवांच्या अंड्यांची 40 ते 60 दिवस याठिकाणी काळजी घेतली जाते. ऑलिव्ह रिडले, हॉर्सबिल, ग्रीन (हरित कासव), लेदर बँक या कासवाच्या काही प्रमुख प्रजाती आहेत. त्यांंपैकी ऑलिव्ह रिडले जातीची दुर्मिळ कासवेच येथे अंडी घालायला येतात असे निरीक्षण असल्याचेही येथील कासव प्रेमी यांनी सांगितले.

हेही वाचा -'जिल्हा परिषद अध्यक्षीय निवडणुकीसाठी सदस्यांना शिवसेनेकडून 25 लाखांची ऑफर'

हेही वाचा -राज्याच्या इतिहासात एवढे निष्क्रिय मुख्यमंत्री झाले नाहीत - नारायण राणे

Last Updated : Mar 24, 2021, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details