सिंधुदुर्ग -जिल्ह्यात अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झालेले असताना पालकमंत्री उदय सामंत केवळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगत आहेत. मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप पैसे आलेले नाहीत. त्याबाबत पालकमंत्री काही बोलत नाहीत. त्यामुळे नुसती डायलॉगबाजी करणाऱ्या पालकमंत्र्यांचा कला क्षेत्राशी जवळचा संबंध असल्याने त्यांचे उच्च व तंत्रशिक्षण हे खाते बदलून त्यांना सांस्कृतिक खात्याचे मंत्री केले पाहिजे, अशी उपरोधिक टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
डायलॉगबाजी करणारे उदय सामंत यांना सांस्कृतिक खात्याचे मंत्री करा - नितेश राणे - भातशेतीचे मोठे नुकसान
निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाचे पंचनामे झाले आहेत, मात्र अद्यापही भरपाईची रक्कम आलेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. तब्बल ५ हजार हेक्टर क्षेत्रातील भात पीक बाधित झाले आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे झालेत मात्र अद्यापही या नुकसानाच्या भरपाईची रक्कम आलेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. तब्ब्ल ५ हजार हेक्टर क्षेत्रातील भात पीक बाधित झाले आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार राणे यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार राणे म्हणाले, परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. मात्र निसर्ग चक्रीवादळाचे पैसे या सरकारने अद्यापही दिले नाहीत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून सरकार काय करणार आहे. असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विचारला. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्यांचा काय उपयोग? कला क्षेत्राशी फार जवळचा संबंध असल्याने त्यांना सांस्कृतिक खात्याचे मंत्री करा, असे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.