महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आमदार नितेश राणे चिखलफेक प्रकरणाचा खटला 'फास्ट ट्रॅक' न्यायालयात चालवा' - आमदार नितेश राणे

राष्ट्रीय महामार्गाचे तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व अन्य संशयितांवर दाखल करण्यात आलेला होता. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Nitesh Rane mudslinging case: demand  Run the case in a 'fast track' court
आमदार नितेश राणे चिखलफेक प्रकरणाचा खटला 'फास्ट ट्रॅक' न्यायालयात चालवा

By

Published : Jul 4, 2020, 9:32 PM IST

सिंधुदुर्ग - राष्ट्रीय महामार्गाचे तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व अन्य संशयितांवर दाखल करण्यात आलेला होता. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष संजय पडते, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या या पत्रावर सह्या आहेत. या पत्रात असे म्हटले आहे की, गतवर्षी ४ जुलै २०१९ रोजी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार नितेश राणे व त्यांच्या अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी तत्कालीन उपअभियंता शेंडेकर यांना पूलावर दोरीने बांधून ठेवले. तसेच त्यांच्यावर चिखलफेक केली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय सेवेत कर्तव्यात असलेल्या एका अधिकाऱ्यावर अशाप्रकारे अमानुषपणे चिखलफेक करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला होता. त्याच दरम्यान आमदार राणे यांनी मालवण येथे सहाय्यक नसे आयुक्तांवर बांगडा फेकला होता.

या सर्व गोष्टी लक्षात घेता, आमदार राणे हे असे सर्व प्रकार करण्यात सराईत आहेत. मात्र, त्यांनी हायवेच्या कामाचा दर्जा सुधारल्याचे दिसून येत नाही. परंतु, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करून सर्वत्र दहशत माजवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. या सर्वांची दखल घेता त्यांच्यासह अन्य संशयित मोकाट फिरत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालून संबंधित अधिकाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या पात्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details