सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का? बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का? असा प्रश्न विचारत आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे नितेश राणे कणकवलीत बोलताना म्हणाले.
आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे - shivsena
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का? बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का? असा प्रश्न विचारत आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
राज्याच्या प्रमुखाला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे माहिती नाही
राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी देशाचा अपमान केला आहे. त्यांना हे माहिती नाही की देशाचा अमृत महोत्सव आहे. त्यांना हे अधिकाऱ्यांना विचारावं लागतं. मुख्यमंत्री पदावर असलेल्या पदावरून विचारावं लागत हा आपल्या देशाचा अपमान नाही का? याबद्दल देशाचा नागरिक म्हणून आपल्याला चीड येत नाही का? असे नितेश राणे म्हणाले. प्रत्येक जण राणे यांच्यासारखं प्रसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही. भावना व्यक्त करू शकत नाही. मात्र असंख्य देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या. राज्याच्या प्रमुखाला देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे माहिती नाही. मग मुख्यमंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होऊ शकत नाही? या घटनेबाबत नागरिक म्हणून संतप्त भावना व्यक्त झाल्या तर त्यात वावगे काय आहे असेही नितेश राणे म्हणाले.
हे सरकार देशविरोधी आहे
हे सरकार हिंदूविरोधी सरकार आहेच पण देशविरोधी सरकार आहे असेही नितेश राणे म्हणाले. देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का? असा सवाल आम.नितेश राणे यांनी केला. ‘देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी’ अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा -नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO