महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitesh Rane Attack On Vinayak Raut खासदार विनायक राऊत हे आमचे ऑफिस बॉय कधी झाले, आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut Criticizes To Narayan Rane ) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane Attack On Vinayak Raut ) यांची प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत ( Nitesh Rane Aggressive On Vinayak Raut) हे नारायण राणेंचे ऑफिसबॉय कधीपासून झाले, असा खोचक सवाल नितेश ऱाणेंनी विचारला आहे. विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी कसा प्रयत्न करत आहेत, हे जर सांगितले, तर कसे होईल, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

BJP MLA Nitesh Rane
भाजप आमदार नितेश राणे

By

Published : Jan 3, 2023, 8:37 PM IST

सिंधुदुर्ग -भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) हे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेनंतर चांगलेच आक्रमक ( Nitesh Rane Aggressive On Vinayak Raut) झाले आहेत. विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांचे काय संबंध आहेत, हे त्यांना काय माहीत असा हल्लाबोल केला. विनायक राऊत हे खासदार आहेत की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ऑफिस बॉय असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ( Chief Minister Eknath Shinde ) भेटायचा प्रयत्न करणाऱ्या विनायक राऊत यांनी आपले आणि पक्षाध्यक्षांचे संबंध चांगले राहतात का, याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही नितेश राणे ( Nitesh Rane Attack On Vinayak Raut ) यांनी यावेळी विनायक राऊतांना दिला.

काय म्हणाले खासदार विनायक राऊतकेंद्रीय मंत्री नारायण राणे ( Vinayak Raut Criticizes To Narayan Rane ) यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या पीएला दम दिला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. विनायक राऊत यांनी म्हटले की, नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.

काय म्हणाले आमदार नितेश राणेआतापर्यंत आम्हाला विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आहेत असे माहीत होते. मात्र ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ऑफिसमध्ये चहा पण पाजायला असतात. म्हणजे तो खासदार आहे कि ऑफिस बॉय आहे आमचा ? त्याला काय माहीत भाजपमध्ये काय चाललंय ? त्याला काय माहीत राणे साहेब आणि मोदी साहेब यांच्यामध्ये काय संबंध आहेत, असा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखांबरोबर आपले पहिले संबंध संभाळावेत. विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी कसा प्रयत्न करताहेत हे जर मी कधी बोललो तर त्यांचे उरले सुरले पण कपडे राहणार नाहीत. म्हणून उगाच त्यांनी पंतप्रधान मोदी, नारायण राणे ही मोठी मोठी नावे त्यांनी घेऊ नयेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details