सिंधुदुर्ग - 'मालवण तालुक्यातील मसुरे येथील मसूरकर जुवा बेटावरील धूपप्रतिबंधक बंधारा मानवी वस्तीच्या बाजूला तत्काळ झालाच पाहिजे, येत्या दोन दिवसांत बंधाऱ्यासाठी सामग्री टाका, अन्यथा आमच्या पद्धतीने हा विषय हाती घेऊ, गाठ माझ्याशी आहे,' असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
'मसुरकर जुवा बेटावरील लोकवस्तीला तत्काळ सुरक्षा बंधारा घाला, अन्यथा आमच्याशी गाठ आहे' - Masurkar Juwa Island news
मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचा प्रश्न मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. याठिकाणी मानवी वस्तीच्या संरक्षणासाठी दीड कोटी रुपये खर्चून धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला. मात्र, बेटाच्या पूर्व आणि पश्चिमेला दोन टोकावर बंधारा बांधून मानवी वस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचा प्रश्न मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. याठिकाणी मानवी वस्तीच्या संरक्षणासाठी दीड कोटी रुपये खर्चून धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला. मात्र, बेटाच्या पूर्व आणि पश्चिमेला दोन टोकावर बंधारा बांधून मानवी वस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी काल सकाळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हपसेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सरोज परब, महिला अध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर, युवक अध्यक्ष विक्रांत नाईक, युवक उपाध्यक्ष आशिष हडकर, विश्वास मसुरकर, यासीन सय्यद, विलास मेस्त्री, तात्या हिंदळेकर, रामदास मसुरकर, सारिका मुणगेकर, देवानंद कांबळी, संजय मसुरकर, शिवाजी परब, सतीश मसुरकर, ओमकार मुणगेकर, पांडू गोलतकर, गणेश राणे, प्रकाश चव्हाण, अनिकेत चव्हाण, एकनाथ मसुरकर अशोक मसुरकर, शुभम मसुरकर आदी उपस्थित होते.